पिंपळनेर परिसरात एमआयडीसीसाठी जागेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST2021-04-12T04:33:49+5:302021-04-12T04:33:49+5:30
या वेळी पिंपळनेर नवेनगर रस्त्यावर जेबापूर शिवार व लगतची शेतजमीन व जामखेली प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पिंपळनेर बल्हाणे रस्त्यावरील ...

पिंपळनेर परिसरात एमआयडीसीसाठी जागेचा शोध
या वेळी पिंपळनेर नवेनगर रस्त्यावर जेबापूर शिवार व लगतची शेतजमीन व जामखेली प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पिंपळनेर बल्हाणे रस्त्यावरील सूतगिरणीजवळील तीनशे ते चारशे एकर जमिनीची पाहणी केली व पांझरा प्रकल्पाचीही पाहणी केली. या वेळी या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी जागा योग्य असल्याचे संकेत दिले.
पिंपळनेर व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी २००१ पासून आज २०२१ पर्यंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, सह उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार हिना गावित, आमदार मंजुळा गावित, आमदार विजयकुमार गावित, माजी मंत्री माणिकराव गावित, माजी आमदार डी.एस. अहिरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. २००५ मध्येही या जागेचा सर्व्हे झाला होता, मात्र या कामाला गती मिळाली नाही.
या वेळी सदर सदस्यांनी नवेनगर व देशशिरवाडे शिवारातील जागा पसंतीस पडली असून आता या ठिकाणी पाठपुरावा करण्याची गरज असणार आहे. उद्योगनिर्मितीत या जागेवर भविष्यात उद्योग निर्माण करण्यासाठी आता एकजुटीने काम करणे गरजेचे असणार आहे. तरी स्थानिक व्यापारी उद्योजक यांनी एकत्र येण्याची गरज आहे.