दोंडाईचा येथील मूर्तीकारांना कोरोनामुळे बसला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:29 PM2020-08-14T12:29:12+5:302020-08-14T12:29:30+5:30

अद्याप मूर्तींची बुकींग नसल्याने मूर्तीकार चिंतेत

The sculptor at Dondaicha was hit financially by the corona | दोंडाईचा येथील मूर्तीकारांना कोरोनामुळे बसला आर्थिक फटका

दोंडाईचा येथील मूर्तीकारांना कोरोनामुळे बसला आर्थिक फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा (जि.धुळे) : स्वातंत्र्यपूर्र्र्वकाळापासून सामाजिक ऐक्य टिकून ठेववण्यासाठी सुरू केलेला गणेशोत्सव अनेक वर्षांपासून दोंडाईचात मोठ्या धामधुमीने साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा सावटाखाली साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार असल्याने सार्वजनिक गणेश मंडळासाठी मोठ्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या दोंडाईचातील मूर्तीकारांना कोरोनाचा आर्थिक डंख बसला आहे.
दोंडाईचात गणेशोत्सव साजरा करण्याची शंभर वर्षांची परंपरा आहे.दोंडाईचात प्रत्येक वर्षी मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव साजरा केला जातो. शहरात दादा, बाबा,व विरभगतसिंगसह सुमारे ३३ सार्वजनिक मंडळे आहेत. गतवर्षी २ हजार २०० घरघुती स्वरूपात गणेशाची स्थापना केली होती.गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीत यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या काळात पूजा अर्चा सह इतर व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक संकट आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाचाआकर्षक व मोठी मूर्ती घेण्याकडे कल असतो. शहरात दोन मोठे मूर्तिकार असून त्यांच्याकडे १०-१२ कारागीर कामाला असतात. त्यामुळे मूर्तिकारसह कारागीराला रोजगार मिळण्यास मदत होते. शहरातून बाहेर गावाला पण ६ फुटापासून १५ फुटापर्यंत उंचीचा गणेश मूर्ती पाठविल्या जातात .त्यामुळे यात लाखोंची उलाढाल होते.
मात्र या वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावयाचा असल्याने जास्तीत जास्त चार फुटापर्यंत गणेश मूर्ती साकारल्या जात आहेत.अन्य जिल्ह्यात मूर्ती पाठविता येणार नाहीत.
प्रत्येक वर्षी किमान १५० मोठ्या मूर्तींची बुकिंग होते.यातून ५-६ लाखाची उलाढाल होते. गणेशोत्सव अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना, दोंडाईचात अद्याप कोणीही मूर्ती बुक केली नाही.
त्यामुळे आर्थिक चक्र थांबले आहे.अद्याप कोणतीही उलाढाल नसल्याने मूर्तिकार चिंतेत पडले आहे. एकंदरीत कोरोनाचा महामारीत मूर्तिकारावर व कारागिरावर आर्थिक संकट कोसळले आहे.परन्तु अनेक वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय संकट काळात बंद करणे शक्य नसल्याने कोरोनाशी झगडत सुरूच ठेवला असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.मुर्तीवर शेवटचा हात मारणे सुरू आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून मोठ मोठ्या गणेश मूर्ती साकारत आहे. यातून काही कारागिरांना काम मिळते. परंतु या वर्षी दीड फुटापासून ४ फुटापर्यंतच गणेश मूर्ती बनवल्या आहेत. अजुन सार्वजनिक गणेश मंडळाची नोंदणी नाही. कच्चा मालचा किमती व वाहतूक खर्च वाढल्याने मूर्ती बनविण्याचा खर्च वाढला असल्याचे मूर्तीकार अशोक भावसार यांनी सांगितले.

Web Title: The sculptor at Dondaicha was hit financially by the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे