विज्ञान शाखेचा निकाल ९८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:28 IST2020-07-17T12:28:05+5:302020-07-17T12:28:28+5:30
सोनगीर : येथील एन.जी.बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.७८ टक्के लागला. यात यावर्षी १६५ विध्यार्थी ...

dhule
सोनगीर : येथील एन.जी.बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.७८ टक्के लागला. यात यावर्षी १६५ विध्यार्थी परीक्षेला बसले होत.े या पैकी १६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आह. पाच विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून तर १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यात राज प्रमोद कासार हा ७८.३० टक्के मिळवून प्रथम, अमेय राजेंद्र तांबट व हीरल हितेश कासार (प्रत्येकी ७७.५३)हे द्वितीय तसेच गुंजन उज्वल जैन ही ७६.७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कला शाखेचा निकाल ८९.०४ लागला. ७३ पैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या सर्वांना प्राचार्य बी. एच. माळी, उपप्राचार्य के. एन. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एस. सोनार, संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बागूल, सचिव चंद्रशेखर बागूल, संचालक एच. एस. विसपुते व वर्ग शिक्षक के. बी. दुसाने यांचे मार्गदर्शन लाभले.