शाळा सुरू केल्या पण पुस्तकेच दिली नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:42+5:302021-07-17T04:27:42+5:30
याबाबत आ. रावल म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे; मात्र त्यांच्यात एकमत नाही. वीज बिल ...

शाळा सुरू केल्या पण पुस्तकेच दिली नाहीत
याबाबत आ. रावल म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे; मात्र त्यांच्यात एकमत नाही. वीज बिल कमी करण्याची घोषणा खुद्द ऊर्जामंत्री करतात पण त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागतो.शेतकरी एवढा अडचणीत असताना शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असताना मात्र एक रुपयादेखील या सरकारने दिला नाही. आता काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या खऱ्या पण विद्यार्थ्यांना पुस्तकेच दिलेली नाहीत. कोरोनामुळे अगोदरच मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असताना हे सरकार कोणताही चांगला निर्णय घेत नसून दरवेळी केंद्र सरकारच्या कोर्टात चेंडू टाकून हे मोकळे होतात. शाळा सुरू केल्या तर पाठ्यपुस्तके दिली पाहिजेत पण या सरकारला केवळ वसुलीसाठीच वेळ आहे की काय? असा सवाल माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी केला आहे.