दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:42+5:302021-07-01T04:24:42+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न जाल्याने, गतवर्षी शाळा बंदच होत्या. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया ...

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न जाल्याने, गतवर्षी शाळा बंदच होत्या. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबवली जात आहे.
धुळे जिल्ह्यात दहावीला २९,५८५ विद्यार्थी होते. मात्र यंदा परीक्षा न घेताच, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी मंडळाने फॉर्म्युला दिला. मागील वर्षीचे गुण, अंतर्गत चाचण्यांचे गुण, तोंडी परीक्षा व विषयनिहाय वेगवेगळी गुणांकन पद्धत आहे.
गेल्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात कोरोनामुळे टाळेबंदी लागली. अंतिम परीक्षा झाल्या नाहीत. तर प्रथम वर्षाचा निकाल सापडत नाही. परीक्षा नसल्याने, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलेले आहे. पहिल्यांदा परीक्षा न होता सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
अनेक ठिकाणी दहावीचे ऑनलाइन वर्ग झालेले नाहीत. मूल्यमापन अंदाजे केले तर अचडणी येतील काय, ही भीती आहे.
यंदाच्या चाचण्या घेण्यास सांगितल्या. तोंडी परीक्षा व इतर बाबींसाठी मुले भेटत नाहीत. फोनवरूनही संपर्क होत नाही, ही शिक्षकांची अडचण आहे.
बोर्डाने जी संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली ती चांगली आहे. मात्र सर्वर डाऊन असल्याने गुणदानाला अडचण येते.
गुणदान कसे होणार?
दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमात आहेत. नेमके गुणदान कसे होणार? मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्या शाखेत प्रवेश मिळणार? अशी पालकांना चिंता आहे. यावर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
- नितीन कापडणीस
शिक्षक, धुळे
विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेण्यात अडचणी आल्या. सर्वरची समस्या आहे. गुणदानास अजून मुदत मिळाली पाहिजे.
- एस.पी. मोरे
शिक्षक, धुळे