शाळकरी मुलांनी केला बैलपोळा सण उत्साहात साजरा; रंधे इंग्लिश मीडियम स्कूलचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST2021-09-06T04:40:07+5:302021-09-06T04:40:07+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून शिंगावे व जातोडे पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी ...

The school children celebrated the Bullfighting Festival with enthusiasm; Randhe English Medium School Initiative | शाळकरी मुलांनी केला बैलपोळा सण उत्साहात साजरा; रंधे इंग्लिश मीडियम स्कूलचा उपक्रम

शाळकरी मुलांनी केला बैलपोळा सण उत्साहात साजरा; रंधे इंग्लिश मीडियम स्कूलचा उपक्रम

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून शिंगावे व जातोडे पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी संदीप पाटील, जया पाटील, माजी सरपंच जगतसिंग सिसोदिया, शाळेचे समन्वयक प्रा. जी. व्ही. पाटील, प्रमोद पाटील, प्राचार्य कामिनी पाटील, सारिका ततार उपस्थित होते.

सर्वप्रथम संस्थेचे सचिव स्व. विश्वासराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आशाताई रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आलेल्या शेतकरी बांधव व सालगडी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शिंगावे येथील कुशल शेतकरी दाम्पत्य संदीप पाटील व जया पाटील यांच्या हस्ते बैलांचे व शेती अवजार साहित्याचे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. कृषिप्रधान भारतीय संस्कृतीत शेतकऱ्यांच्या बरोबरीने बैल रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतात म्हणून वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो, असे प्रतिपादन आशाताई रंधे यांनी केले.

याप्रसंगी मनीषा लोखंडे, वंदना पाटकरी यांनी पोळा सणाचे महत्त्व व अत्याधुनिक शेती व बैलाद्वारे केलेली शेती यातील बारकावे आपल्या मनोगतातून व्यक्त केले, तसेच ज्योती देशमुख यांनी अन्न वाचवा व शेतकऱ्यांचा आदर करा, अशी स्वरचित सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

यानिमित्ताने बैलपोळा, निसर्ग व शेतकरी या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम दर्शन अर्जुन भोई, द्वितीय विलास कैलास भिल, तृतीय गौरव रवींद्र चौधरी यांना अनुक्रमे क्रमांक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण छाया पाटील, मंजिरी पिंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदना पांडे, ज्योती कुवर, समाधान राजपूत, उमेश राजपूत, मनीष पाटील, रमाकांती विश्वकर्मा, मनीषा पाटील, शेख रिदवाना, तनुजा गांगुर्डे यांनी प्रयत्न केले. मनीषा पटेल यांनी सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन दाखविला. त्याबद्दल पालकांनी कौतुक केले. सूत्रसंचालन पवित्रा राजपूत, तर आभार स्वाती चव्हाण यांनी व्यक्त केले.

Web Title: The school children celebrated the Bullfighting Festival with enthusiasm; Randhe English Medium School Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.