शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी, विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:59+5:302021-04-02T04:37:59+5:30

शालेय जीवनात शिष्यवृत्ती या परीक्षेला विशेष असे महत्त्व आहे़ पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेतली जात ...

Scholarship exam now on 23rd May, relief to students | शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी, विद्यार्थ्यांना दिलासा

शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी, विद्यार्थ्यांना दिलासा

शालेय जीवनात शिष्यवृत्ती या परीक्षेला विशेष असे महत्त्व आहे़ पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेतली जात होती़ यात बदल करण्यात आला असून, आता हीच परीक्षा पाचवी आणि आठवीच्या वर्गातील मुलां-मुलींसाठी घेण्यात येत आहे़ या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणासोबतच अवांतर ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त अशी आहे़ परिणामी या परीक्षेसाठी विद्यार्थी सहभागी होत असतात़ जिल्ह्यातील ज्या शाळांमधून पाचवी आणि आठवीचे जे विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ठ होतील त्यांच्या नावाची यादी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाठविण्यात येते़ त्यानंतर ही यादी अंतिम करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येत असते़ ही अवांतर चालणारी प्रक्रिया आहे़

शिष्यवृत्ती परीक्षा

२३ मे

ऑनलाईन अर्ज भरता येणार

१० एप्रिलपर्यंत

असा करावा अर्ज

ज्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी इच्छुक असतील ते विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आपली नावे कळवितात़ मुख्याध्यापक ती नावे एकत्रित करून शिक्षण विभागामार्फत शासनाकडे पाठवितात़

कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा

१) कोरोनाचा कहर हा कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे़ त्याचा त्रास हा शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्याचे नियोजन आखण्यात आले आहे़

२) कोरोनाचा फैलाव हा कमी झालेला नाही़ सुरक्षितता म्हणून केवळ तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे़ ही परीक्षा मे महिन्यात होणार असली तरी त्यात बदल होऊ शकतो़

३) परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास सुरू केला होता़; पण आता हीच परीक्षा पुढे ढकलण्याचे नियोजन केल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळणार आहे़

Web Title: Scholarship exam now on 23rd May, relief to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.