दोंडाईचा नूतन विद्यालयातील १०२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:44 IST2019-02-17T22:44:10+5:302019-02-17T22:44:27+5:30
शिक्षकांचा वार्षिक पारितोषिक

dhule
दोंडाईचा : शहरातील नूतन विद्यालयातील एन.एम.एम.एस.च्या परीक्षेत १३४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविल्याने विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सत्कार करण्यात आला.
विविध प्रकारच्या स्पर्धेतील प्राविण्य मिळविणाऱ्या २८७ विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ज्ञानोपासक संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषीक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र देशमुख होते. कार्यक्रमास सचिव जुईताई देशमुख-पाटील, संचालक अमित पाटील, संचालिका अनिता रवींद्र देशमुख, प्राचार्य ए. डी. पाटील, पर्यवेक्षिका एन.एन. चव्हाण, एस.एस.पाटील, प्रा. पी. जी. कागणे, सी. एस. पाटील, एन. पी. भावसार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी पुलवामामध्ये आतंकवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य ए. डी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमात कृतिशील शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य ए. डी. पाटील, कलाभूषण पुरस्कार प्राप्त एस. ए. पाटील, उपक्रमशील.शिक्षक पुरस्कार प्राप्त एस.एन. ठाकरे, एन. पी. भिलाणे, पी.आर. देवरे, ए .बी. खांडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक म्हणून डी.जे. निंबाळकर, एल.जे.राजपूत यांना प्रमाण पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन. पी. भावसार, एन. पी. भिलाणे.एन. पी. बागल, पी.पी. महिरे यांनी केले.