जळालेले रोहित्र बसविल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:28 IST2020-03-04T12:28:24+5:302020-03-04T12:28:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ुतिसगाव : ढंडाने येथील टकाºया वस्तीवरील रोहित्र १० ते १२ दिवसा पासून जळून खाक झाले होते. ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
ुतिसगाव : ढंडाने येथील टकाºया वस्तीवरील रोहित्र १० ते १२ दिवसा पासून जळून खाक झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवार २ रोजी प्रसिद्धी केले होते. त्याची दखल घेत नगाव युनिटचे अभियंता निलेश पवार यांच्या पुढाकाराने दुसºयाच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत टकाºया येथील डीपीचे रोहित्र बसवण्यात आले आहे. त्याच पद्धतीने महावितरण कांपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दखल घेतल्याने येथील रवींद्र नामदेव पाटील, समाधान पाटील, अनिल पाटील, गोरख साळूंके, योगेश पाटील, छोटू पाटील व शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे.