सतीमाता यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:55 IST2020-02-02T22:55:08+5:302020-02-02T22:55:39+5:30

भाविकांचे श्रद्धास्थान : सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर, बोराडी परिसरातील सर्वात मोठी यात्रा

 Satimata Yatra festival begins today | सतीमाता यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

Dhule


शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे सुमारे ३०० वर्षापूर्वीचे श्रीसती देवीचे मंदिर असून माघ नवमीच्या शुभमुहुर्तावर ३ तारखेपासून यात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ़तुषार रंधे यांच्याहस्ते मंदिरात महाआरती होणार आहे़ परिसरातील सर्वात मोठी यात्रा याठिकाणी भरते़ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज असून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ही यात्रा बोराडी परिसरातील सर्वात मोठी यात्रा असून धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. नवस फेडण्यासाठी वरण-बट्टीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, ज्वेलरीचे स्टॉल, मनोरंजनासाठी आकाश पाळणे, विविध खेळण्यांची साधने घेऊन व्यावसायिक दाखल झाले आहेत. या यात्रेत संसारोपयोगी भांड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या यात्रेतून लाखो रुपयांची उलाढाल होते. दुपारी पारंपारिक पद्धतीने तगतरावची वाजत-गाजत मिरवणूक निघते.
रविवारी गावात रोहिणी येथील शालिक शांताराम यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. तर सोमवारी बोराडी येथील सुकलाल गोपाळ यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, जि.प़ सदस्या जताबाई पावरा, पं.स. सदस्या सरीता पावरा, सरपंच सुरेखा पावरा, ग.स.बँकेचे माजी चेअरमन निशांत रंधे, साहेबराव पितांबर पाटील, नथ्थु बडगुजर, शिवाजी पाटील, शशांक रंधे, शामकांत पाटील, रविंद्र शिंदे, भागवत पवार, अशोक महाजन, डॉ.भास्कर पाटील, डॉ.बाळासाहेब पाटील, गोविंदा सोनवणे, भरत पावरा, संजय पाटील, जिजाबराव पाटील, विजय सत्तेसा, सुकदेव मालचे, अर्जुन भिल, डोंगरसिंग पावरा, छायाबाई बडगुजर, भावनाबाई पाटील, रेखाबाई पाटील, प्रमिला पावरा, चंद्रसिंग पवार, मंजुबाई भिल, उज्जनबाई भिल, उर्मिलाबाई पावरा, नवाबाई भिल, कंचन पावरा आदी प्रयत्नशील आहेत.

Web Title:  Satimata Yatra festival begins today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे