विखरणचे सरपंचपद एकदाही आरक्षित झाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST2021-01-18T04:32:59+5:302021-01-18T04:32:59+5:30
शिरपूर-शहादा मार्गावर विखरण गाव असून, या गावांची लोकसंख्या ७ हजार इतकी आहे़ सन १९४९ मध्ये या ग्रामपंचायतीची स्थापना ...

विखरणचे सरपंचपद एकदाही आरक्षित झाले नाही
शिरपूर-शहादा मार्गावर विखरण गाव असून, या गावांची लोकसंख्या ७ हजार इतकी आहे़ सन १९४९ मध्ये या ग्रामपंचायतीची स्थापना झाली़. या ग्रामपंचायतीत ५ प्रभागात १३ सदस्य निवडले जातात़. २ हजार ३२० पुरुष व २ हजार ३६२ असे एकूण ४ हजार ६८२ मतदार संख्या आहे़
या ग्रामपंचायतीत पुरुष मतदारपेक्षा ६२ स्त्री मतदार अधिक आहे़ या ७१ वर्षात आतापर्यंत दर पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदाचा बहुमान ओबीसी पुरुष-स्त्री व खुले पुरुष-स्त्री समाजाला प्राप्त झाला आहे़.
मात्र अद्यापपर्यंत ४ आरक्षण व्यतिरिक्त इतर एससी, एसटी पुरुष-स्त्री या पदाचे आरक्षण निघालेले नाही़ त्यामुळे या गटाला अद्यापपर्यंत सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळालेली नाही़ निदान या निवडणुकीत ही संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
दहिवद येथील ग्रामपंचायत स्थापनेला ६५ वर्षे उलटून या ग्रामपंचायतीत सरपंच पद एससी गटाला अद्यापपर्यंत मिळालेले नाही़ या ग्रामपंचायतींमध्ये १७ सदस्य असून गावाची लोकसंख्या ७ हजार ८५० इतकी असून मतदार संख्या ५ हजार १३१ इतकी आहे़ निदान यावर्षी सरपंच पद एससी निघण्याची चर्चा होऊ लागली आहे़
युती सरकारच्या काळात सरपंच पद थेट जनतेतून निवडून दिले जात होते़ आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपद निवडले जाणार आहे़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या़ ग्रामपंचायतींची १८ ला मतमोजणी झाली़ कदाचित २२ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे़ या सोडतीकडे आता गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे़