शिवगान स्पर्धेत सांघिक विजेता सरस्वती संगीत विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:47+5:302021-02-17T04:42:47+5:30
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे – धुळे शहरी विभाग वैयक्तिक विजेते : ...

शिवगान स्पर्धेत सांघिक विजेता सरस्वती संगीत विद्यालय
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे – धुळे शहरी विभाग वैयक्तिक विजेते : १) निखिल जगताप २) आसावरी गुरव ३) रमाकांत कढरे.
सांघिक विजेते - १) सरस्वती संगीत विद्यालय २) कमलाबाई कन्या शाळा ३) जाणता राजा ग्रुप धुळे ग्रामीण विभाग.
वैयक्तिक विजेते - १) यश निकम (शिरपूर), २) धीरज जगताप, शिंदखेडा, ३) जागृती सोनवणे, निमडाळे
सांघिक विजेते १) तलवार ग्रुप (शिरपूर) २) किसान ग्रुप (शिंदखेडा), ३) नटराज अकादमी (दोंडाईचा)
सर्व विजेत्यांना भाजप महिला आघाडी अध्यक्षा माया परदेशी, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर, प्रदेश युवती आघाडी संयोजक अमृता पाटील, धुळे महानगर उपमहापौर कल्याणी अंपळकर, ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
‘शिवगान’ स्पर्धेतील विजेत्यांनी या स्पर्धेपुरते स्वतःस सीमित न ठेवता भावी आयुष्यात मोठा गायक किंवा गायिका होण्याचे ध्येय उरी बाळगावे. स्वतःच्या नावासोबत आई, वडील,परिवार, शहर व राज्याचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर करावे, असे प्रतिपादन धुळे भाजप महानगर संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण कल्पना मानेकर-नाईक, भरत पवार, चंद्रकांत महाजन यांनी केले. भाजप महानगर सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रमुख राहुल बागुल यांनी आभार प्रदर्शन केले.