संत भीमा भोई जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST2021-06-01T04:26:57+5:302021-06-01T04:26:57+5:30

धुळे : भोई समाजाचे आराध्य दैवत संत भीमा भोई यांची १७१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कोरोनाच्या संसर्गामुळे ...

Sant Bhima Bhoi Jayanti celebration | संत भीमा भोई जयंती साजरी

संत भीमा भोई जयंती साजरी

धुळे : भोई समाजाचे आराध्य दैवत संत भीमा भोई यांची १७१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ अभिवादनाचा कार्यक्रम घेऊन साध्या पध्दतीने जयंती उत्सव झाला. अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या अंतर्गत कार्यरत धुळे जिल्हा भोई समाज सेवा संघाच्या तालुका आणि महानगर शाखेच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम झाला. कोरोना नियमांचे पालन करीत मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम झाला. महानगर अध्यक्ष विश्वनाथ फुलपगारे यांनी संत भीमा भोई यांचे कार्य आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयी माहिती देत मार्गदर्शन केले.

यावेळी नंदलाल फुलपगारे, विरू फुलपगारे, मच्छिंद्र फुलपगारे, विलास फुलपगारे, विशाल वाडिले, राहुल वाडिले, महेंद्र फुलपगारे, भटू ढोले, जयेश फुलपगारे, ओम फुलपगारे, साई फुलपगारे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Sant Bhima Bhoi Jayanti celebration