सांगवी पोलिसांनी गुरांचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:41+5:302021-09-11T04:37:41+5:30

९ रोजी संध्याकाळी ५ वाजता सांगवी पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ व पोलीस कर्मचारी चत्तरसिंग खसावद, सुनील मोरे, ...

Sangvi police seized a cattle truck | सांगवी पोलिसांनी गुरांचा ट्रक पकडला

सांगवी पोलिसांनी गुरांचा ट्रक पकडला

९ रोजी संध्याकाळी ५ वाजता सांगवी पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ व पोलीस कर्मचारी चत्तरसिंग खसावद, सुनील मोरे, सिद्धांत मोरे, फारुकी असे महामार्गावर गस्त घालत असताना एका खबऱ्यामार्फत जनावरे भरलेला कंटनेर जात असल्याची माहिती देण्यात आली़ त्यामुळे पळासनेर गावाजवळील अन्नपूर्णा हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचला़ सेंधव्याकडून गाडी क्रमांक एमएच १८-बीजी-५०९८ येत असताना पोलिसांनी अडविली़ सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी ताडपत्री उघडून पाहिले असता त्यात दाटीवाटीत, पाय दोरीने आखूड बांधलेल्या २० म्हशी दिसून आल्या. चालक ताहिर असलम खान (२७) रा.निमराणी बैखडी ता. खसरावद जि.खरगोन (मध्य प्रदेश) याच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना सदर म्हशी मालेगाव येथे घेऊन जात असल्याचे सांगितले़

कंटनेरमध्ये ६ लाखाच्या २० म्हशी व २० लाखाचा कंटनेर असा एकूण २६ लाखाचा मुद्देमाल सांगवी पोलिसांनी जप्त केला़ विनापरवाना मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात वाहतूक करून नेताना मिळून आल्यामुळे चालकाविरोधात भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा सन १९६० चे अधिनियम कलम ११, १, घ, ड, च व मोटार व्हेईकल ॲक्ट कलम ६६/१९२, २ प्रमाणे सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

Web Title: Sangvi police seized a cattle truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.