साने गुरूजी स्मृती दिन कारागृहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:39 IST2020-06-11T21:39:03+5:302020-06-11T21:39:23+5:30

शुभारंभ : बंदिवानांसाठी व्हीडीओ कॉलींग

Sane Guruji Smriti Din celebrated in the jail | साने गुरूजी स्मृती दिन कारागृहात साजरा

dhule

धुळे : येथील मध्यवर्ती कारागृहात साने गुरूजी यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला़ साने गुरूजींच्या प्रसिध्द प्रार्थनेचे सामुहीक गायन करण्यात आले़
कारागृह अधीक्षक डी़ जी़ गावंडे यांच्या हस्ते साने गुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले़ यावेळी वरिष्ठ तुरूंगाधिकारी दिपा आगे, वैद्यकीय अधिकारी शिवाजी जायभाये, तुरूंगाधिकारी नेहा गुजनाथी, एस़ पी़ ठाकरे, शिक्षक हेमंत पोतदार आदी उपस्थित होते़
साने गुरुजी सन १९३२ आणि १९४० ते १९४२ या काळात धुळे कारागृहात होते़ आचार्य विनोबा भावे यांच्या गीताई कथनातून साने गुरूजींनी गीताई पुस्तकाचे लेखन याच कारागृहात केले़ तसेच धुळे कारागृहातून त्यांची रवानगी नाशिक कारागृहात झाल्यावर त्यांनी ‘श्यामची आई' या पुस्तकाचे लेखन केले़ स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे ब्रिटींशांनी त्यांना कारागृहात डांबले होते़

Web Title: Sane Guruji Smriti Din celebrated in the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे