लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : हरण्यामाळ तलावाच्या परिसरात वन जमिनीतून वाळूची चोरटी वाहतूक वन विभागाच्या पथाकाने उघडकीस आणली़रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडून ही कारवाई करण्यात आली़ हरणमाळ तलावा लगत अवैधरित्या वाळूचे दोन ट्रॅक्टर भरताना वनविभागाने जप्त केले आहेत.याप्रकरणी ट्रॅक्टर चालक नारायण गोपाळ वाघ, नितीन मोतीलाल मोरे या दोघांना वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ तसेच त्यांच्याविरुध्द वन गुन्ह्याची नोंद केली आहे़ जप्त ट्रॅक्टर मुद्देमालासह वन विभागाच्या ताब्यात आहे़सदर कारवाई सहायक वनसंरक्षक संजय पाटील, वन क्षेत्रपाल महेश पाटील, मुकेश सोनार, राकेश पाटील, अनिल पाटील, संजय विभांडीक यांच्या पथकाने केली़हरण्यामाळ तलाव परिसरात वन विभागाच्या जमिनीतून सातत्याने गौण खनिजाची चोरी सुरू आहे़
हरणमाळ परिसरात वाळू चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:00 IST