हरणमाळ परिसरात वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:00 IST2020-06-07T22:00:20+5:302020-06-07T22:00:40+5:30

वन विभागाची कारवाई : दोन ट्रॅक्टर जप्त, चालक ताब्यात

Sand theft in Haranmal area | हरणमाळ परिसरात वाळू चोरी

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हरण्यामाळ तलावाच्या परिसरात वन जमिनीतून वाळूची चोरटी वाहतूक वन विभागाच्या पथाकाने उघडकीस आणली़
रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडून ही कारवाई करण्यात आली़ हरणमाळ तलावा लगत अवैधरित्या वाळूचे दोन ट्रॅक्टर भरताना वनविभागाने जप्त केले आहेत.
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक नारायण गोपाळ वाघ, नितीन मोतीलाल मोरे या दोघांना वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ तसेच त्यांच्याविरुध्द वन गुन्ह्याची नोंद केली आहे़ जप्त ट्रॅक्टर मुद्देमालासह वन विभागाच्या ताब्यात आहे़
सदर कारवाई सहायक वनसंरक्षक संजय पाटील, वन क्षेत्रपाल महेश पाटील, मुकेश सोनार, राकेश पाटील, अनिल पाटील, संजय विभांडीक यांच्या पथकाने केली़
हरण्यामाळ तलाव परिसरात वन विभागाच्या जमिनीतून सातत्याने गौण खनिजाची चोरी सुरू आहे़

Web Title: Sand theft in Haranmal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे