शिवरायांसह संभाजी महाराजांची जाती धर्मात वाटणी दूर्दैवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:17 IST2020-03-02T12:17:28+5:302020-03-02T12:17:53+5:30
प्रा़ शरद गोरे : मनपा शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती संभाजी महाराजांनी तलवारीचे सामर्थ्य जगाला दाखवले. बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केले होते. मात्र समाज युगपुरुषांना संकुचित वृत्तीने जाती धर्मात वाटून घेतो़ हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे यांनी केले. ते महापालिकेने आयोजित केलेल्या शिवचरित्र व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी माजी आ.राजवर्धन कदमबांडे, प्रा.शरद पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, माजी महापौर मोहन नवले, जयश्री अहिरराव, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, सुनील बैसाणे, स्नेहल जाधव आदी उपस्थित होते. प्रा. शरद गोरे यांनी व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प गुंफले. शिवाजी महाराजांना जातीभेद मान्य नव्हता. संभाजी महाराजांचे वकील, न्यायाधीश मुस्लिम होते. मात्र सध्या धर्माच्या नावावर अधर्माच राजकारण सुरु आहे. संभाजी महाराजांनी वैश्विक तत्वज्ञानाची पायाभरणी केली होती़ त्यांना संकुचित दृष्टिकोनातून बघणे दुर्दैवी असल्याचे प्रा.गोरे म्हणाले.