रक्तदान करीत शाहु महाराजांना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:59 IST2020-06-26T21:58:40+5:302020-06-26T21:59:00+5:30

रक्तदान शिबिर : मराठा सेवा संघाचे कार्यालय, प्रतिसाद

Salute to Shahu Maharaj by donating blood | रक्तदान करीत शाहु महाराजांना वंदन

रक्तदान करीत शाहु महाराजांना वंदन

धुळे : लोकहितकारी राजे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ बिग्रेड व मराठा सेवा संघाच्यावतीने रक्तदान करुन त्यांना अभिवादन करण्यात आले़ गणपती पुलाजवळील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला़ सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून हा उपक्रम घेतल्याचे आयोजकांनी म्हटले आहे़
याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले़ त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या धुळे जिल्हा संघटक शिवमती सिमा वाघ यांनी रक्तदान करुन शिबिराला प्रारंभ केला़ याप्रसंगी यशवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, साहेबराव देशमुख, प्रविण पाटील, आनंद पाटील, मंडाले, लहू पाटील, रणजित भोसले, विरेंद्र मोरे, रामकृष्ण पाटील यांच्यासह शिवमती सुमती पाटील, शहराध्यक्ष डॉ़ पूजा भामरे, नुतन पाटील, अर्चना साळुंखे, चंद्रकला कुवर, मिना ठाकरे, सुनीता सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़
याप्रसंगी युवा नेते यशवर्धन कदमबांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रणजित भोसले यांचा सन्मान करण्यात आला़ रक्तदान शिबिराला रक्तसेवा रक्तपेढीचे सहकार्य लाभले़
मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या रक्तदान शिबिरात सायंकाळी उशिरापर्यंत ४६ बाटल्यांचे संकलन झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली़

Web Title: Salute to Shahu Maharaj by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे