महापौर पदासाठी चार अर्जाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST2021-09-12T04:41:19+5:302021-09-12T04:41:19+5:30
धुळे महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने राजकीय पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. दरम्यान शनिवारपासून उमेदवारी अर्जाला विक्रीला सुरूवात ...

महापौर पदासाठी चार अर्जाची विक्री
धुळे महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने राजकीय पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. दरम्यान शनिवारपासून उमेदवारी अर्जाला विक्रीला सुरूवात झाल्याने पहिल्याच दिवशी चार अर्जाची विक्री झाली आहे.
महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता असल्याने महापौर व उपमहापौर पदाची संधी भाजपाच्या सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना देण्यात आली होती. त्यानंतर पुढील अडीच वर्षे न्यायालयाच्या निर्देशानुसार महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये महापाैरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात स्थायी समितीच्या माजी सभापती बालीबेन मंडाेरे, नगरसेविका प्रतिभा चाैधरी, प्रदीप कर्पे, नरेश चाैधरी, युवराज पाटील, संजय पाटील आदींचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे.
विरोधकांकडून देखील प्रयत्न
शनिवारपासून उमेदवारी अर्ज विक्रीला सुरूवात झाल्याने महापौर पदासाठी अपक्ष उमेदवार मोमीन आसिफ इस्माईल यांनी दोन अर्ज घेतले आहेत. तर कॉग्रेस पक्षाकडून मदिना समशेर पिंजारी यांनी दोन तसेच एमआयएमचे नगरसेवक अन्सारी सईदा इकबाल गणी यांनी देखील एक अर्ज घेतला आहे.