माध्यमिक शिक्षकांचे वेतन १० तारखेच्या आत होणार शिक्षणाधिकारी : वैद्यकीय बिलेही निकाली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:31+5:302021-09-16T04:44:31+5:30
धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचा सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात ...

माध्यमिक शिक्षकांचे वेतन १० तारखेच्या आत होणार शिक्षणाधिकारी : वैद्यकीय बिलेही निकाली काढणार
धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचा सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात मागील दीड वर्षांपासून कायम शिक्षणाधिकारी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आता काही दिवसांपासून पूर्ण वेळ शिक्षण अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे संघटनेतर्फे त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले. त्यात प्रामुख्याने शिक्षक-शिक्षेकतर कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन वेळेवर करावे,शिक्षण विभागाने वरिष्ठ पातळीवर सहा महिन्यांसाठी वेतन आर्थिक निधीची मागणी करणे, शिक्षकांची वैद्यकीय बिले व इतर प्रलंबित बिले तत्काळ मंजूर करणे, पी.एफ च्या स्लिपा मिळणे, संचमान्यता तत्काळ मिळणे, अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडविणे, कोविड काळात कोरोना योद्धा सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागामार्फत कार्यमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अंशतः अनुदानित शाळेचे वेतन नियमित व वेळेवर करण्यात यावे, आदी मागण्यांंसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, जिल्हाध्यक्ष आबा पाटील, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, किरण मासुळे, राजेंद्र पाटील, महिला आघाडी अध्यक्षा अपर्णा पाटील, जयवंत पाटील, रावसाहेब चव्हाण, मुश्ताक शेख, दीपक पाटील, अमोल पाटील, कैलास अमृतकर, आर. पी. खरवंटे, दामोदर पाटील, आदी उपस्थित होते.