साक्री पोलिसांनी केले दोन चोर जेरबंद, आठ मोटारसायकल केल्या हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 15:49 IST2021-03-17T15:48:43+5:302021-03-17T15:49:00+5:30
मोटारसायकली चोरल्याची माहिती चोरटयांनी दिली

साक्री पोलिसांनी केले दोन चोर जेरबंद, आठ मोटारसायकल केल्या हस्तगत
धुळे - साक्री शहरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलीच्या तपासात त्या मालेगाव येथील रमेश दयाराम हाळनर याने चोरल्याचे उघडकीस आले आहे. साक्री पोलिसांनी संशयित आरोप रमेश हाळनर व त्या मोटारसायकल खरेदी करणारा साक्री तालुक्यातील भडगाव येथील सजन देवबा सोनवणे यासही अटक केली. दोघांकडून चोरीस गेलेल्या आठ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या मोटारसायकली कुमुंबा, नामपूर, साक्री, पिंपळनेर परिसरातून चोरल्याची माहिती चोरटयांनी दिली आहे.साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळून २४ फेब्रुवारी रोजी मोटारसायकल चोरीस गेली होती. त्यापकरणी साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त माहिती मिळाली की, मालेगाव येथील सराईत गुन्हेगार साक्रीला येत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचून मोटारसायकल चोर रमेश दयाराम हाळनर रा. रामपुरा ता. मालेगाव यास तपासकामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे साक्री कृउबा जवळून चोरीस गेलेली मोटारसायकल व मास्टर चावी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणी त्याला अटक केली.अटके दरम्यान पोलीस चौकशीत त्यांने गुन्हा केल्याचे कबूल केले. याशिवाय पिंपळनेर, नेर, नामपूर व कुसुंबा परिसरातून आणखी ७ मोटारसायकल चोरी केल्याचेही त्याने कबूल केले. त्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली त्याने सजन देवबा सोनवणे रा. भडगाव ता.साक्री यास विकल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसानी सजनला ही अटक केली. त्याच्याकडून सातही चोरीस गेलेल्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह पोलीस सहायक उपनिरीक्षक बी.बी.नऱ्हे, हेकॉ. आर.एस.जाधव, रायते, पोलीस नाईक संजय शिरसाठ, कॉन्स्टेबल विजय पाटील, जगदीश अहिरे, राज पाटील यांनी केली.
पोलिसांचे आवाहन - गुन्ह्यात आठ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. ज्या कुणी नागरिकांची वाहने चोरी गेली आहेत. त्यांनी साक्री पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]() | ReplyForward |