दहशतवाद्याशी लढतांना साक्रीचा जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:03 IST2017-10-11T15:02:12+5:302017-10-11T15:03:14+5:30
जम्मू काश्मिरमधील घटना : कुटुंबिय नाशिकला स्थायिक

दहशतवाद्याशी लढतांना साक्रीचा जवान शहीद
ठळक मुद्देकिशोर यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्यदलात प्रवेश केला.आणि मंगळवारी दहशवाद्याशी लढतांना त्याना वीर मरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी हर्षल किशोर खैरनार, मुलगी वैदिका (वय ३ वर्ष) आणि लहान मुलगा कृष्णा (२), सेवानिवृत्त वडील किशोर खैरनार, आई व मोठा भाऊ असा परिवार आहे. शहीद किशोरचा मोठा भाऊ हा मुंबई पोलिसात नोकरीला आहे. खैरनार कुटुंबिय नाशिकमध्ये दिंडोरी रस्त्यावर म्हसरुळ येथे पेट्रोलपंपाजवळ साईबाबा मंदिराच्या मागे राहतात.
वितरण कंपनीत नोकरीला होते. त्यांनी २० वर्ष साक्री येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात काम केले. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर कुटुंबियासोबत नाशिक येथे स्थायिक झाले.