१०० दंत शल्यचिकित्सकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:03 IST2019-11-12T12:02:32+5:302019-11-12T12:03:08+5:30

दंतवैद्यकीय परिषद : विविध विषयांवर झाली चर्चा

 सहभाग Participation of dental surgeons | १०० दंत शल्यचिकित्सकांचा सहभाग

dhule

धुळे : इंडियन डेंटल एसोसिएशन शाखेतर्फे जवाहर वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसीय राज्यस्तरीय दंत वैद्यकीय परिषद घेण्यात आली़ देशभरातून आलेल्या शंभराहून अधिक दंतशल्य चिकित्सक सहभागी झाले होते़
परिषदेचे उदघाटन महाराष्ट्र अध्यक्ष इंडियन डेंटल एसोसिएशन डॉ़ सुरेश मेश्राम यांच्या हस्ते झाले़ कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. अमोल राठी, डॉ. शाह, डॉ. अरुण दोडामनी, डॉ. अजित पवार, डॉ. अमोल जाधव, धुले डॉ. नितिन पाटील, डॉ़ श्रेणिक ओसवाल, डॉ प्राची शुक्ल, डॉ. कविता नानदेड़कर, डॉ. सारिका ओसवाल, डॉ. सचिन बडगुजर, डॉ. सुनील कोरांने, डॉ. मटाणी, डॉ़ अनोली, डॉ. नेहान सिद्दिकी उपस्थित होेते़
परिषदेत दंतरोपन शस्त्रक्रिया, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविन्यासाठी कम्पोजिट रेसिनद्वारे उपचार, तोंडातील शस्त्रक्रिया, अत्याधुनिक पद्धतीने माइक्रोस्कोप, रुटकैनाल उपचार, डिजिटल स्माईल डिजाइन करण्यासाठी स्कैनर, जबड्याच्या सांध्याचे आजार तसेच आॅर्थोस्कोपी दुर्बिनीद्वारे उपचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले़
या प्रसंगी महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ मेश्राम यानी धुळे शाखेने वर्षभरात राबविलेल्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी धुळे शाखेचे सचिव डॉ.नितीन पाटील यांनी शाखेने कामाचा आढावा वाचला.

Web Title:  सहभाग Participation of dental surgeons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे