विद्यारत्न पुरस्काराने सागर चौधरी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST2021-09-27T04:39:27+5:302021-09-27T04:39:27+5:30

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री बापूसाहेब डी. डी. पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन नवी पनवेल, नवी मुंबई आणि तरुण भारत ...

Sagar Chaudhary honored with Vidya Ratna award | विद्यारत्न पुरस्काराने सागर चौधरी सन्मानित

विद्यारत्न पुरस्काराने सागर चौधरी सन्मानित

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री बापूसाहेब डी. डी. पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन नवी पनवेल, नवी मुंबई आणि तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने, रयत शिक्षण संस्थेचे आधारवड कर्मवीर भाऊराव पाटील आणि आदर्श शिक्षण समूहाचे आधारवड कै. बापूसाहेब डी. डी. विसपुते यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष धनंजय विसपुते (पनवेल, नवी मुंबई), महेंद्र विसपुते (धुळे), प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक सायन्स अभिमत विद्यापीठ लोणी, अहमदनगर येथील कुलगुरू डॉ. विष्णू मोरे, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. सागर चौधरी यांना कार्यस्फूर्ती आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ देऊन गौरविण्यात आले.

प्रा. चौधरी यांनी कोरोना कालावधीत एक हजार पोलीस बांधव यांना व्हिटॅमिन सीयुक्त सरबत, एक हजार एन-९५ मास्कचे वाटप केले होते. तसेच वेळोवेळी गरजूंना रक्तदान केले आहे. गेल्या वेळी देवपूर भागात स्वखर्चाने दोन हजार रोपांचे नागरिकांना मोफत वाटप केले होते. प्रा. सागर चौधरी हे जिल्हा उपाध्यक्ष भाजप धुळे महानगर या पदावर काम करीत आहेत. या पुरस्काराबद्दल प्रा. सागर चौधरी यांचे अभिनंदन होत आहे.

Web Title: Sagar Chaudhary honored with Vidya Ratna award