२० शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:41 IST2020-06-26T21:41:20+5:302020-06-26T21:41:48+5:30
धुळ्यात श्रध्दांजली : गलवान खोऱ्यातील घटना, मेणबत्ती पेटवून आदरांजली

२० शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
धुळे : चीनी सैन्याशी झालेल्या झटापटीत आपले २० जवान शहिद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मात्र, भारताची ही भूमी परत घेण्यासाठी केंद्र सरकार कोणती कारवाई करणार असा सवाल आमदार कुणाल पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने धुळ्यातील शहिद अब्दुल हमीद स्मारकाजवळ मेणबत्त्या पेटवून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़
गलवान खोºयात चीनी सैन्याने भारतीय भूमी हडप केली आहे. चीनी सैन्याची ही आगळीक रोखण्यासाठी भारतीय वीर सैन्याने विरोध केला़ या झटापटीत आपले २० जवान शहिद झाले. मात्र भारत सरकार अद्यापही कोणतीही कारवाई करीत नाही. चीनच्या या आगळीकीचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षाने व्यापक मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी धुळे जिल्हा काँग्रेसच्यावतीने शिवतिर्थावरील शहिद अब्दुल हमीद स्मारकाजवळ शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रारंभी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर आमदार कुणाल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी शहिदांना श्रध्दांजली व्यक्त करतांना मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आमदार किसनराव खोपडे, रमेश श्रीखंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, प्रमोद सिसोदे, वाणूबाई शिरसाठ, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, डॉ. दरबारसिंग गिरासे, लहू पाटील, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, पितांबर महाले, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, मुज्झफ्फर हुसैन, डॉ. अनिल भामरे, दीपक पाटील, मुकूंद कोळवले, उत्तमराव माळी, मनोहर पाटील, अभिमन्यू भोई, पंढरीनाथ पाटील, शांताराम राजपूत, बापू खैरनार, भानुदास गागुंर्डे, दीपक साळुंखे, प्रज्योत देसले, अविनाश शिंदे, प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, गुलाबराव पाटील, अशोक सुडके, बळीराम राठोड, के. डी. पाटील, वसिम बारी, ज्ञानेश्वर मराठे, वसंत पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र खैरनार, कुलदिप निकम, विश्वासराव बागुल, चेतन सोनवणे, दिनेश भामरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.