साक्रीत तिरंगा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:42 IST2019-08-14T22:42:00+5:302019-08-14T22:42:23+5:30

३७० फूट ध्वज, भारतमातेच्या दिल्या घोषणा

Sacred tricolor rally | साक्रीत तिरंगा रॅली

साक्री येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी

साक्री :  येथील विद्या विकास मंडळ संस्थेच्या सी.गो. पाटील महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सी. गो. पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली.
     रॅलीचे उदघाटन विद्या विकास मंडळ संस्थेचे सचिव सुरेश पाटील यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज उंचावून करण्यात आले. शहराच्या विविध मार्गांवरून ३७० फूट लांबीचा राष्ट्रध्वज विद्यार्थी विद्यार्थिनींनी उंच धरला होता.  भारत मातेच्या जयघोषाने साक्री शहर दुमदुमले होते.  रॅलीचा समारोप साक्री तालुका क्रीडा संकुल येथे झाला. यावेळी  प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा विद्यार्थी विस्तारक गंगाधर कोलमवार, योगेश्वरी बिरारी, गुंजन भोसले, सोमेश्वर हिरे, संयोजक चेतन पाटील, अभिषेक पाटील, अजय वाघ, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sacred tricolor rally

टॅग्स :Dhuleधुळे