ग्रामीण विद्यार्थ्यांची आॅलीम्पियाडमध्ये बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:46 IST2020-03-03T22:46:03+5:302020-03-03T22:46:25+5:30
सामान्य ज्ञान स्पर्धा : जुनवणे शाळेचे ३६ विद्यार्थी उत्तीर्ण, दुसरीतील ज्ञानेश्वर गुणवत्ता यादीत

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नॅशनल आॅलिम्पियाडच्या सामान्य ज्ञान परीक्षेत ग्रामीण भागातील तब्बल ३६ विद्यार्थी चमकले आहेत़
धुळे तालुक्याच्या जुनवणे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे हे सर्व विद्यार्थी डीन्स्टीक्शनमध्ये उत्तीर्ण झाले़ तर इयत्ता दुसरीतील ज्ञानेश्वर गंगाधर पाटील हा विद्यार्थी द्वितीय विभागात तृतीय क्रमांक पटकावून गुणवत्ता यादीत आला आहे़ मुलींची संख्या सर्वाधिक आहे़
या विद्यार्थ्यांना अनिल सोनार, वैशाली शिंदे, कविता पवार, शामकांत पाटील आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले़
या यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख अविनाश पवार, एसएमसी अध्यक्ष घनशाम पाटील, सरपंच दिपक पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे़
नॅशनल आॅलीम्पियाड परीक्षांमध्ये आतापर्यंत शहरी भागातील मुलांची नावे चमकत असत़ परंतु आता ग्रामीण भागातील मुला मुलींनी देखील या परीक्षांमध्ये यश संपादन करायला सुरूवात केली आहे़ स्पर्धेच्या युगात आम्हीही मागे नाहीत असे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे़