कापडणे येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:09+5:302021-08-27T04:39:09+5:30
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. पवार या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता, कापडणे-देवभाने फाट्यावर त्यांना निवेदन देण्यात ...

कापडणे येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. पवार या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता, कापडणे-देवभाने फाट्यावर त्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील कापडणे गाव हे सर्वात मोठे गाव असून, येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात कापडणेसह परिसरातील १४ गावे जोडण्यात आलेली आहेत. परंतु अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री अभावी रुग्णांवर वैद्यकीय उपचार करता येत नाही. या १४ गावातील रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे कापडणे येथे सुसज्ज अत्याधुनिक सोयींनीयुक्त ग्रामीण रुग्णालय मंजूर करून उभारण्यात यावे. निवेदन देतेवेळी प्रवीण शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बापू खलाणे, माजी पं स सदस्य रवींद्र पाटील, धनूरच्या लोकनियुक्त सरपंच सत्यभामाबाई रोहिदास शिंदे, उपसरपंच कमल पटेल, विकास पवार, तामसवाडी हेकंडवाडीचे सरपंच भास्कर आबा पाटील, युवराज चौधरी, प्रा. अशोक पाटील, आत्माराम चौधरी, साहेबराव खैरनार, अरुण शिंदे, रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सदानंद पाटील, भूषण ब्राह्मणे आदी उपस्थित होते.