सदस्यांना नसते. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही. इतिवृत्ताचे वाचन दोन-दाेन वर्षे न करता सभा घेतल्या जातात तरी कशा, महापाैर निवडीचे इतिवृत्त वाचन न करण्यात आल्याने सध्याचे महापाैर बेकायदेशीर आहेत, असा आरोप सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक शीतल नवले यांनी सभेत केला.
मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२१-२२ अंदाजपत्रकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला आयुक्त अजिज शेख, प्र. नगर सचिव मनोज वाघ आदींसह सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक शीतल नवले सभेला सुरवात करताना म्हणाले की, सन २०२०-२१ मधील अर्थसंकल्पात नगरसेवकांनी प्रभागातील सुचविलेली कामे का घेण्यात आलेली नाही, दोन वर्षाचे इतिवृत्ताचे वाचन का झालेले नाही, आधी आपल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तोपर्यत सभा स्थगित करण्याची करावी, शहरातील काही ठराविक प्रभागांमध्ये कामे हाेताना काही प्रभाग शहरात येत नाही का, शहरातील अल्पसंख्याक प्रभागात एकदा जाऊन बघा काय परिस्थिती आहे. मगच सभेला सुरवात करा तोपर्यंत सभा स्थगित करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नगरसेवक नवले यांनी दिला.
आताचे महापाेैर हेच महापाैर आहेत की नाही-नवले यांचा सवाल
२०१९-२० व २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सुचविलेली कामे आलेली नाहीत. दोन वर्षापूर्वी झालेल्या महापाैर निवडीचे इतिवृत्त वाचलेले नाही. त्यामुळे आताचे महापाेैर हेच महापाैर आहेत की नाही, काय समजावे. त्यामुळे अनियमितता टाळली पाहिजे. शहरात सध्या दहा ते बारा दिवसांनतर पाणी पुरवठा होतो. याकडे मात्र मनपा प्रशासनाकडून काहीही उपाययोजना होत नाही.
मनपाचे बेजट फेक- नागसेन बोरसेंचा आरोप
सदस्यांना ठराव अवलोकनासाठी आला पाहिजे, मात्र येत नाही. त्यामुळे काही तरी गोलमाल असल्याचा आरोप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी हे बजेट फेक असल्याचे सांगितले. मनपातून बेकायदेशीर बिल काढली जातात. या सर्व बिलाची चाैकशी करण्यासाठी लेखाधिकारी नियुक्त करावा, सभेला सक्षम अधिकारी असल्याशिवाय सभा घेण्यात येऊ नये, महापाैरांनी ४४ कोटी रुपयांच्या वाढीव तरतुदी सुचविल्या आहेत. तर स्थायीने १४ कोटींची कामे सुचविली होती. त्यात १२ कोटींची कामे कमी का केली, असा सवाल बोरसे यांनी सभेत केला. यावेळी आयुक्त शेख यांची बैठक असल्याचे नगरसचिव वाघ यांना सांगितले. यावेळी सुनील बैसाणे यांनी आक्षेत सभागृह त्याग करीत सभेतून काढता पाय घेतला.