पैसे काढण्यासाठी नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:00 IST2020-04-07T22:00:09+5:302020-04-07T22:00:43+5:30
सोशल डिसटंन्सी : जीवणावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी नियम तर बॅकेबाहेर मात्र नियमाकडे होतेय सर्रास दुर्लक्ष

dhule
धुळे/सोनगीर : कोरोना विषाणूचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स हा एक महत्वाचा उपाय असल्याने संपुर्ण देशात त्याचा अवलंब होत आहे. मात्र गावातील बँकेत आणि किराणा दुकानावर येत असलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स चा जणू विसरच पडल्याने कोरोना विषाणूचा धोका टाळण्याच्या दृष्टीने नियम कठोर करणे गरजेचे आहे.
देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्र बंद आहेत. दरम्यान नागरिकांना आपल्या जीवन आवश्यक गरजा भागविण्यासाठी पैश्याची गरज भासते़ यासाठी केंद्र शासनातर्फे तीन महिन्यापर्यंत प्रत्येकी महिन्यात पाचशे रुपये जनधन खाते असलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे़
ठिक-ठिकाणी उल्लंघन
शहरातील मालेगाव रोडवरील बॅक आॅफ बडोदा, स्टेट बॅक मुख्य शाखा, शहरातील ग्राहक सेवा केंद्र, टपाल कार्यालय, बॅक आॅफ महाराष्ट आदी बॅकाबाहेर ग्राहकांनी मुख्य दरवाजापासून परिसरात गर्दी केली होती़ पाच- पाच ग्राहकांना बॅकेत सोडण्यात येत होते़ मात्र बॅकेच्या परिसरात ग्राहकांची घोळका केला होतो़
बॅकेत नियम, बाहेर उल्लंघन
सुरक्षितेसाठी बॅकेत पाच-पाच ग्राहकांना सोडण्यात येत होते़ मात्र बॅकेच्या आवारात ग्राहकांच्या किंवा नागरिकांच्या सुरक्षित बॅकेकडून सोशल डिस्टन्सच होण्यासाठी गोल रिंगची आखणी करण्यात आलेली नव्हती़ बहूसंख्य बॅकेच्या परिसरात मंगळवारी ग्राहकांचा रांगा लागण्या होत्या़ त्यातील काहींनी तोडाला मास्क, रूमाल लावला होतो़ तर काही बिनधास्त गर्दीमध्ये वावरतांना दिसून आले़ एखादा संशयित व्यक्ती या रांगेत उभा राहील्यास अनेकांच्या धोका निर्माण करू शकतो़