Rotary's inauguration ceremony | ‘रोटरी’चा पदग्रहण सोहळा थाटात

dhule

दोंडाईचा : येथील रोटरी क्लब आॅफ दोडाईचा सनराईजचाचा सातवा पदग्रहण समारंभ व्यापारी भवनात नुकताच पार पडला. नूतन अध्यक्ष कुलदीपसिंह गिरासे व सचिव महेंद्रसिंह गिरासे यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र टोणगावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिमांशू शाह ,श्रीकांत इंदानी व अनिष शहा होते.
यावेळी कुलदीपसिंह गिरासे यांनी मावळते अध्यक्ष नीलकंठ पाटील यांचाकडून तर सचिव महेंद्रसिंह गिरासे यांनी मावळते सचिव सुरेंद्र गिरासे यांचा कडून पदभार स्वीकारला. कुलदीपसिंह गिरासे म्हणाले, पर्यावरण संतुलित राहण्यासाठी पर्यावरणावर आधारित विविध उपक्रम दोंडाईचा परिसरात राबविले जातील. डॉ. टोणगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुल शिंदे, अमित चित्ते, जयसिंग गिरासे, ऋषिकेश बोरसे, संजय धनगर, शैलेश बोरसे, नरेंद्र बाविस्कर, अमर थोरात, रोहन गिरासे, महेंद्र शिंदे, मनीष कुकरेजा, बलराम कुकरेजा, जयराम पाटील, सचिन वाडीले, विजय संदांशिव, अक्षय गिरासे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अ‍ॅड.जतीन वाघेला यांनी केले.

Web Title: Rotary's inauguration ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.