२५ दिवसापासून रोहित्र जळालेल्या स्थीतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:35 IST2020-03-05T12:35:10+5:302020-03-05T12:35:38+5:30

वसमार परसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी पिकांचे होतेय नुकसान

Rohrita has been burned for 3 days | २५ दिवसापासून रोहित्र जळालेल्या स्थीतीत

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथील गेल्या २५ दिवसांपासून रोहित्र जळाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहित्र बंद असल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे.
म्हसदी ३३-११ केव्ही वीज उपकेंद्र्राअंतर्गत येणाऱ्या वसमार येथील लौखरा शिवारातील ८ फेब्रुवारी रोजी रोहित्र ांचवीस दिवसापासून जळाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. मात्र, याकडे वीज कंपनीच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष असून ‘आमची डीपी लवकर बसवा’ अशी विनवणी शेतकºयांनी वीज कंपनीकडे केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून तत्काळ रोहित्र बसविण्याची गरज आहे.
तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरिपाने शेतकºयांची घोर निराशा केली. रब्बीवर शेतकºयांची आशा असताना वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे.
शेतकºयांनी एकत्र येवून रोहित्राची तजवीज करुनही ते बंदच राहिले. त्यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी पाहणी केली. रोहित्र जळालेले आहे, असे वीज कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. रोहित्र सुरू करण्यासाठी सर्व शेतकºयांनी प्रथम दोन-दोन हजार रुपये बिल भरा त्यानंतर रोहित्र बदलवू, असे सांगितले. त्यानंतर उशिराने रिपोर्ट सादर केला.
परिणामी लौखरा शिवारातील ५० हेक्टरवरील रब्बी पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. गहू, मका, कांदे, भुईमूग आदी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. याबाबत शेतकºयांनी म्हसदी येथील वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश खैरनार यांची भेटही घेतली. त्यांनी बघतो, कनिष्ठ अभियंत्यांना सांगतो, लवकरच रोहित्र देऊ, असे सांगितले. रोहित्र लवकर बसवून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी केली. अन्यथा वीज कंपनीसमोर आंदोलन छेडू, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
२५ दिवसापासून जळालेल्या रोहित्रामुळे मगन बाबूलाल महाले, मुकेश प्रभाकर पाटील, साहेबराव मुरलीधर पाटील, भटू शिवाजी हिरे, आनंदा रघुनाथ पाटील, छोटू राजाराम पाटील, महादू आत्माराम ध्यानिस या शेतकºयांचे रब्बीचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत आहे.

Web Title: Rohrita has been burned for 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे