धुळ्यात चाकूचा धाक दाखवून एकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:32 IST2019-11-14T11:32:13+5:302019-11-14T11:32:30+5:30

आझादनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

Robbed one by knocking him in the dust | धुळ्यात चाकूचा धाक दाखवून एकास लुटले

धुळ्यात चाकूचा धाक दाखवून एकास लुटले

आॅनलाइन लोकमत
धुळे : चाकूचा धाक दाखवून अमळनेरच्या खडी व्यावसायिकास लुटल्याची घटना ४ नोव्हेंबर रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनला १२ रोजी रात्री तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर येथील खडी क्रेशर व्यावसायिक जैनुल नसिरोद्दिन शेख (वय ३६) हे महामार्गावरून जात असतांना दुचाकीवर आलेल्या तिघांनी शेख यांना मारहाण करून चाकू त्यांच्या पोटाला लावला. तसेच उजव्या हाताच्या दंडाला चावा घेत, त्यांच्याजवळील ३५ हजार रूपये रोख व एक १० हजार रूपये कंपनीचा मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हॉटेल नालंदाजवळ घडली. होती. याप्रकरणी जैनुल शेख यांनी १२ रोजी रात्री ११ वाजता फिर्याद दिली. त्यावरून आझादनगर पोलीस स्टेशनला अज्ञात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान महामार्गावर घडलेल्या लुटीच्या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

Web Title: Robbed one by knocking him in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे