रस्ते कामाला महानगरात अखेर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:09 IST2020-05-30T22:08:23+5:302020-05-30T22:09:05+5:30
विकासकाम। लॉकडाउन असतानाही प्राधान्य

रस्ते कामाला महानगरात अखेर सुरुवात
धुळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी धुळ्यात देखील होत आहे़ पण, काही प्रमाणात शिथीलता आणली असल्याने विकास कामाला प्राधान्य दिले जात आहे़ पावसाळ्याच्या अनुषंगाने खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे़
कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते़ परिणामी कोणत्याही प्रकारची विकासाची कामे मार्गी लागत नव्हती़ रस्त्यावरील खड्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याची डागडुजी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते़ टप्प्या-टप्प्याने हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न असलतरी लॉकडाउनमधील शिथीलता महत्वाची असल्याने हे काम थांबविण्यात आले होते़ आता थोड्याफार प्रमाणात शिथिलता मिळाल्याने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे़ पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित आहे़