तब्बल २५ वर्षानंतर रस्त्यांची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 14:58 IST2020-12-06T14:58:06+5:302020-12-06T14:58:33+5:30
कालिकादेवी नगर : रस्ता काॅंक्रीटीकरणाचे काम सुरू

dhule
धुळे : येथील साक्री रोडवरील कालिकादेवी नगरात तब्बल ३५ वर्षांनंतर रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या भागातील रस्त्यांचे काॅंक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
कालिकादेवी नगरसह इतर नवीन वसाहती वसून सुमारे ३५ ते ४० वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांमध्ये प्रथमच रस्ता काॅक्रीटीकरण केले जात आहे. त्या कामाचा शुभारंग नगरसेविका सुशिला ईशी यांच्या पुढाकारातून केले जात आहे. अनेक अनेक जुन्या वसाहती आहेत. मात्र वर्षाेनुवर्षे या ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे. अजूनही अनेक जुन्या वसाहतीत मातीचे रस्ते असल्याने नागरीकांना अडचणींना ताेंड द्यावे लागते. त्यात प्रभाग क्रमांक पंधरामधील कालिकानगरचा समावेश हाेता. या भागात अनेक वर्षापासून रस्त्याची समस्या हाेती. त्याबाबत नगरसेविका सुशिला ईशी यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार नागरी दलित वस्ती अंतर्गत निधीतून या रस्त्यांचे काॅक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी २५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ सुशिला ईशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मिलिंद माेरे, विष्णू बनसाेडे, सुभाष राजपूत, आशा बनसाेडे, मिना माेरे, याेगेश ईशी, ज्याेती राजपूत, सुरूबाई काेळी, सुनंदा साेनवणे, प्रितिजा पाटील, कैलास काेळी यांच्यासह नागरीक उपस्थित हाेते. तब्बल चाळीस वर्षानंतर कालिका नगरात प्रथमच रस्ता काॅक्रीटीकरणाचे काम हाेत असल्याने नागरीकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.