शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

प्रवासात मनोरंजनाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:40 PM

एस.टी.त बसविली वाय-फाय यंत्रणा,  प्रवाशी घेतात चित्रपट मालिकांचा आनंद

ठळक मुद्दे प्रवाशी घेतात चित्रपट मालिकांचा आनंदधुळे विभागात ८४४ पैकी ६६७ बसेसमध्ये हे वाय-फाय यंत्र बसविले आहे. मनोरंजनात्मक प्रवास सुखकर झालेला आहे.

प्रवासात मनोरंजनाची अनुभूतीएस.टी.त बसविली वाय-फाय यंत्रणा,  प्रवाशी घेतात चित्रपट मालिकांचा आनंदआॅनलाईन लोकमतधुळे : एस.टी.ने लांबपल्याचा प्रवास करायचा म्हटल्यावर अनेकजण नापसंती व्यक्त करतात. कारण त्यांच्यादृष्टीने हा प्रवास कंटाळवाणा असतो. परंतु आता एस.टी.नेही आधुनिकतेची कास धरीत प्रवाशांच्या करमणुकीसाठी  मोफत वाय-फाय सुविधा सुरू करून, प्रवाशांचे मनोरंजन करणे सुरू केले आहे. मनोरंजनात्मक प्रवास सुखकर झालेला आहे.  धुळे विभागात ८४४ पैकी ६६७ बसेसमध्ये हे वाय-फाय यंत्र बसविले आहे. या यंत्राच्या माध्यमातून प्रवाशी मनोरंजनाचा आनंद  घेत आहे. एस.टी.ने. प्रवास करणाºयांचा प्रवास मनोरंजनात्मक व्हावा म्हणून जानेवारी २०१७ पासून महामंडळाने आपल्या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केलेली आहे. ही सुविधा यंत्र मिडीया सोलूशन मुंबई यांच्यामार्फत देण्यात येत आहे.धुळे विभागात मार्च १७ पासून वाय-फाय यंत्र बसविण्यास सुरवात झालेली आहे. या यंत्रात  मराठी, हिंदी, गुजराथी   भाषेचे  जवळपास १० ते १५ चित्रपट डाऊनलोड केलेले आहेत. त्याचबरोबर कॉमेडी एक्स्प्रेससोबतच इतर मराठी मालिकादेखील आहे. केवळ मोठ्यासाठीच नाही तर लहान मुलांचाही विचार करण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी  कार्टन्स डाऊनलोड केलेले आहेत. या मनोरंजनामुळे एस.टी.चा प्रवास सुखकर झालेला आहे.   यंत्रात डाऊनलोड केलेले चित्रपट, मालिका, कार्टुन्स हे दीड-ते दोन महिन्यांनी अपडेट करण्यात येतात. जुन्याच्या जागी नवीन  चित्रपट, मालिकां टाकण्यात येतात.तरूणांकडून सर्वाधिक वापरही यंत्रणा नवीन असली तरी याचा वापर तरूणांकडून अधिक होत असल्याचे चित्र आहे. अप-डाऊन करणारे अनेक तरूण अर्ध्या-एक तासाच्या प्रवासात चित्रपट, मालिका पहात असतात. 

आगारनिहाय धुळे विभागात असलेल्या  बसेस. कंसात वाय-फाय यंत्र बसविलेल्या बसेसची संख्या अशी- धुळे १३४ (१२८), साक्री-१०१ (८८), नंदुरबार-१२० (९८), शहादा-११० (६७), शिरपूर-११६ (८८), अक्कलकुवा-७१ (४०), शिंदखेडा-६२ (५५), नवापूर-६९ (५८), दोंडाईचा- ६१ (४५).डाऊनलोड नाहीवाय-फाय म्हटले म्हणजे अनेकजण आपल्याला पाहिजे ते डाऊनलोड करीत असतात. मात्र एस.टी.मधील वाय-फाय हे फक्त त्यांच्याच यंत्रापुरते मर्यादीत आहे. याच्यामार्फत काहीही डाऊनलोड करता येत नाही. तसेच येथील वाय-फायचा फायदा  व्हाटसअप, युट्युबसाठी करता येत नाही.प्रवाशांकडून प्रतिसाद : देवरेप्रवाशांच्या करमणुकीसाठी महामंडळाच्या बसेसमध्ये वाय-फाय यंत्र बसविले आहे. याच्या माध्यमातून प्रवाशांना चित्रपट, मालिका बघता येतात. याला प्रवाशांकडून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय महामंडळाच्या योजनांचीही माहिती प्रवाशांना मिळते, अशी माहिती धुळे विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.