रस्त्याला काटेरी झुडुपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 20:30 IST2020-10-02T20:30:20+5:302020-10-02T20:30:43+5:30
बळसाणे-कढरे रस्ता : झुडपांचा प्रवाशांना बसतो फटका

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे-कढरे रस्त्यालगत ठिकठिकाणी काटेरी झुडपे उगवली आहेत. या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. तसेच काटेरी फांद्याचा फटका प्रवाशांना बसत असतो. ही काटेरी झुडपे तोडण्यात यावीत, अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे.
साक्री तालुक्यातील बळसाणे हे गाव जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असल्याने याठिकाणी बळसाणे येथून धुळे जाण्यासाठी कढरे मागार्ने जावे लागते. बळसाणे ते कढरे चार ते साडेचार किलोमीटर रस्त्याची गेल्या अनेक वषार्पासून अत्यंत दुरवस्था झाली आह. या रस्त्याची गिट्टी पुर्णत: उखडली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्यांबरोबर काटेरी झुडपांनी रस्ता व्यापला गेला आहे.
कढरे व बळसाणे येथील शेतकऱ्यांना शेती कामाला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्याने बैलगाडी नेत असताना मजुरांना काटेरी झुडपे लागत असतात. यासाठी संबधित विभागाने तातडीने काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी आहे.