रस्ता खचल्याने रूग्णांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:13 PM2019-11-04T23:13:46+5:302019-11-04T23:14:20+5:30

हरण्यामाळ गावाकडे जाणार रस्ता : वाहतूक बंद असल्याने अनेकांची होतेय अडचण

Road closure for patients | रस्ता खचल्याने रूग्णांची तारांबळ

dhule

googlenewsNext

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने हरण्यामाळ गावाकडे जाणारा रस्ता खचला आहे़ रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने जवाहर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रूग्णांना स्ट्रेचरवर टाकून न्यावे लागत आहे़
जिल्हयात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पुर आले होते. त्यामुळे अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाणी नकाणे तलाव भरण्यासाठी महिन्यापासून सोडण्यात आले़ काही दिवसापासून हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी ३० वर्षापासुन हरण्यामाळ रस्त्याजवळी जाणाऱ्या सांडव्याव्दारे जात होते़ मात्र साक्रीरोडवरील जवाहर वैदयकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूने अन्यात व्यक्तीने जुना बंधारा बंद करून नव्याने बंधारा जेसीबी यंत्राच्या साहय्याने दगड व मातीने तयार केला आहे़ त्यामुळे काही दिवसापासुन सततधार पाऊसाने नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी जुन्या बंधाºयातून न जाता नव्याने तयार केला बंधाºयातून सुरू आहे़ रविवारी पाण्याचा प्रवाहात वाढ झाल्याने रस्ता पुर्णपणे खलचा आहे़ त्यामुळे हरण्यामाळ, जवाहर वैदयकीय महाविद्यालय, जवाहर पशू खाद्य, छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचा मार्ग बंद झाला आहे़ वाहतूक सेवा बंद झाल्याने रविवारी रूग्णांना ट्रेचरवर टाकून वैद्यकीय महाविद्यालयापर्यत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तर स्स्त्याने प्रवास करणाºया नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शासकीय अधिकारी, मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे़
प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या दोन महिन्यापूर्वी वैदयकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बंधाºयाने अडचणीचा सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने तातडीने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती़ मात्र जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची उपाय-योजना न केल्याने विद्यार्थ्यांनासह नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़
अन्यथा होऊ शकते प्राणहाणी
वैद्यकीय महाविद्यालयाजवळून बेकायदेशीर बंधारा तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे़ रात्री बेरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहन नाल्यातून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रशासना प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याने खाजगी संस्था चालकांकडून जेसीबीच्या मदतीने नाल्यातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे़

Web Title: Road closure for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे