शिरुडच्या ५ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST2021-03-28T04:34:18+5:302021-03-28T04:34:18+5:30
दुचाकीसाठी पैसे आणले नाहीत, विवाहितेचा छळ धुळे : मोटारसायकल घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून रेखा खंडु ...

शिरुडच्या ५ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल
दुचाकीसाठी पैसे आणले नाहीत, विवाहितेचा छळ
धुळे : मोटारसायकल घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून रेखा खंडु पवार (वय ३९, रा. म्हसवे, ता. पारोळा, ह. मु. एकवीरा नगरातील एसआरपी काॅलनी, धुळे) या विवाहितेचा सासरच्या लोकांनी सासरी तसेच माहेरी देखील छळ केला. १० जून २०१४ रोजी लग्न झाल्यानंतर वेळोवेळी छळ झाल्याचे आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी खंडू आत्माराम पवार, भटाबाई आत्माराम पवार, राजू, आत्माराम पवार, अनिता राजु पवार सर्व रा. म्हसवे, ता. पारोळा, मीरा प्रकाश बैसाणे, प्रकाश बैसाणे रा. जानवे, ता. अमळनेर यांच्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पोतदार करीत आहेत.
मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
धुळे : शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारात एका शेडमध्ये सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्यांना समजावण्यास गेला असता अमरदीप सुदामसिंग गिरासे (३२, रा. तांडे) याला देखील मारहाण करण्यात आली. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला ही घटना घडली. याप्रकरणी दीपक भिल आणि इतर दोन जणांविरुध्द थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.