शिरुडच्या ५ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 22:01 IST2021-03-27T22:01:40+5:302021-03-27T22:01:59+5:30
धुळे : तालुक्यातील शिरुड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता प्रमोद सिताराम महिराळे (रा. दक्षता पोलीस काॅलनी, धुळे ) याला ...

शिरुडच्या ५ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल
धुळे : तालुक्यातील शिरुड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता प्रमोद सिताराम महिराळे (रा. दक्षता पोलीस काॅलनी, धुळे) याला मारहाण केल्याप्रकरणी संजय पानपाटील, नागेश संजय पानपाटील, राधा संजय पानपाटील, विवेक संतोष भामरे, ताऊ संजय पानपाटील रा. शिरुड यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सोनार करीत आहेत.