मराठा सेवा संघाच्या आढावा बैठकीचे आज आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:36+5:302021-07-04T04:24:36+5:30
मराठा सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात होणाऱ्या या बैठकीसाठी विभागीय आढावा समिती येणार आहे. यात समिती प्रमुख के.डी पाटील, ...

मराठा सेवा संघाच्या आढावा बैठकीचे आज आयोजन
मराठा सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात होणाऱ्या या बैठकीसाठी विभागीय आढावा समिती येणार आहे. यात समिती प्रमुख के.डी पाटील, साहेबराव देसाई, चंद्रकांत देसले, सुरेश पाटील, माधुरी भदाणे, प्रमोद अहिरराव, योगेश पाटील, डॉ. संदीप कडलक, दीपक भदाणे, राजेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विषयांवर विषयावर चर्चा होणार आहे. संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरक्षणाच्या विषयावर तीन भागात मांडलेली भूमिका तालुका व ग्रामपातळीवर प्रिंटेड स्वरूपात पोहोच होण्याबाबत व प्रसिद्धीचे नियोजन करणे, जिल्हा कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी स्तरावर काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची नावे सादर करणे, मराठा सेवा संघाची नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्याबाबत विचारविनिमय करून तसे नियोजन केंद्रीय कार्यालयास कळविणे आदी विषयांवर चर्चा होणार आहेत. या बैठकीस उपस्थितीचे आवाहन धुळे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, सचिव एस.एम.पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.