शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
6
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
7
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
8
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
9
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
10
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
11
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
12
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
13
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
14
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
15
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
16
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
17
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
18
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
19
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
20
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:22 IST

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनेचा बेमुदत संप : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. अव्वल कारकून अतिरिक्त होऊन त्यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पदभरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाभरातील कर्मचाºयांनी १० आॅक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता.
महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहायक असे करण्याचे मान्य केले होते. त्याबाबतचा शासन निर्णय काढावा, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड-पे ४३०० वरून ४८०० रूपये करण्याचे मान्य केले होते. मात्र त्याचाही शासन निर्णय निघाला नाही. अव्वल कारकून या संवर्गाची वेतनश्रेणीमधील त्रूटी भरून काढावी, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत शासनाने मान्य केले असून त्याबाबतचा निर्णय घेणे, पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पद पदोन्नतीचे असल्यामुळे सरळसेवेने न भरणे, नायब तहसीलदारांचे सरळसेवा भरतीचे पदे प्रमाण ३३ टक्केवरून २० टक्के करणे व पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करणे याबाबत शासन निर्णय पारित करणे, आकृतिबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपीक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदे वाढविले आहेत. यामध्ये कोणतीही कपात न करता त्वरित मंजुरी देऊन शासन निर्णय पारित करणे, संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणूक, पुरवठा व महसूलेत्तर इतर कामांसाठी नव्याने आकृतीबंध तयार करून त्वरित सादर करून मंजुरी आदेश निर्गमित करणे आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. सुरुवातीला पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरु केले आहे. मात्र शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व महसूल व पदोन्नत नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष व्ही.सी. येरमे, संघटक अल्पेश बारापात्रे, कार्यकारिणी सदस्य ललीत लाडे, सल्लागार सुनील चडगुलवार, धीरज चौधरी, महिला प्रतिनिधी कविता नायडू यांनी केले.
तहसील कार्यालयांमधील कामकाज ठप्प
तहसील कार्यालयात ८० टक्के कर्मचारी महसूल विभागाचे आहेत. यातील पदोन्नत नायब तहसीलदार ते शिपाई पदापर्यंतच्या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. मंडप टाकून तहसील कार्यालयाच्या बाहेर कर्मचारी बसले असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. बाहेर बसलेले कर्मचारी बघून प्रशासकीय कामासाठी आलेले शेतकरी व सामान्य नागरिक आल्यापावली परत जात होते. चावडी वाचनानंतर आता तहसीलस्तरावरील समिती कर्जमाफीच्या अर्जांची छाननी करीत आहे. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी नसल्याने छाननी कामातही अडथळा निर्माण झाला होता.