होळनांथे येथील श्री.रा.रा.खंडेलवाल विद्यालयातील १९९६ च्या दहावीच्या वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:52+5:302021-09-02T05:17:52+5:30
होळनांथे (वार्ताहर) : शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील श्री. रा. रा. खंडेलवाल विद्यालयातील १९९६ च्या दहावीच्या वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन नुकतेच नागेश्वर ...

होळनांथे येथील श्री.रा.रा.खंडेलवाल विद्यालयातील १९९६ च्या दहावीच्या वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन
होळनांथे (वार्ताहर) : शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील श्री. रा. रा. खंडेलवाल विद्यालयातील १९९६ च्या दहावीच्या वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन नुकतेच नागेश्वर परिसरात पार पडले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक आण्णासो. पी. ओ. गुजर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वतीपूजन करून १९९६ च्या दहावीतील वर्गमित्र-मैत्रिणी जे आज या जगात नाहीयेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित सर्व वर्ग मित्र-मैत्रिणी यानी आपापला परिचय करून देताना शिक्षण काय केले, हल्ली काय व्यवसाय करताय हेही स्पष्ट केले. तद्नंतर आर. बी. पाटील सर, आर. सी. पाटील सर, सैंदाणे सर, मेटकर सर, पी.ए. पाटील सर, इंदासे सर, हिरे मॅडम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. ओ. गुजर सर यानी मनोगत व्यक्त करून उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडून शेवटी नागेश्वर परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन जितेंद्र जाधव व विजय सिसोदिया यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दयानंद पवार, मिथुन खिलोसिया, योगेश पवार, किशोर मराठे, किशोर चव्हाण, तनविर खाटीक, कैलास भोई, सीमा धनगर, दीपश्री पवार, योगिता राजपूत, शोभा राजपूत, वैशाली गिरासे आदींनी परिश्रम घेतले.