सेवानिवृत्त जवानाचे स्वागत व मिरवणूक काढून कृतज्ञता व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:38 IST2020-03-05T12:38:26+5:302020-03-05T12:38:51+5:30
दोंडाईचा : मित्र परिवारातर्फे सत्कार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : सोळा वर्ष सैन्यदलात कार्यरत राहून देशसेवा केली याचे औचित्य साधून बुधवारी सेवानिवृत्त जवानाची दोंडाईचा रेल्वे स्टेशनवरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
दोंडाईचा येथील जवान दिनेश प्रल्हादराव पाटील हे नुकतेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेत. त्यांचे शालक निलेश पाटील व मित्र परिवाराने घोड्यावरून मिरवणूक काढली. सैन्य दलात असताना सोळा वर्षांच्या कालावधीत आठ ठिकाणी पोस्टींग मिळाली. त्यात सेक्टर जम्मू काश्मीर, राजस्थान कोटा, नागालँड, लखनउ, अहमदाबाद या ठीकाणी देशसेवा बजावली. त्यांच्या मिरवणुकीचे ठीकठीकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. डिजेवर देशभक्तीपर गीते लावून वातावरण देशभक्तीपर करण्यात आले.
त्यानंतर हुडको कॉलनीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याने जवान दिनेश पाटील भारावून गेले होते. या वेळी दौलत सूर्यवंशी, सुनील धनगर, समाधान ठाकरे, जिवन भोई, किरण पाटील, राहूल पाटील, सागर मराठे, किरण तांबे, किशोर ठाकूर, पवन मराठे, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.