मालपूर येथे सेवानिवृत्त जवानाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:03 IST2020-02-06T12:02:41+5:302020-02-06T12:03:19+5:30
गावातील बॉर्डर ग्रुपने केले होते कार्यक्रमाचे आयोजन

मालपूर येथे सेवानिवृत्त जवानाची मिरवणूक
आॅनलाइन लोकमत
मालपूर (जि.धुळे)-सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानाची ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढली.
मालपुर येथील जवान आनंदा पावबा देवरे (माळी) हे नुकतेच सैन्य दलातून निवृत्त झाले. याचे औचित्य साधुन मालपूर गावातील बॉर्डर ग्रुप सह ग्रामस्थांतर्फे त्यांची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढत जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागताने जवान आनंदा माळी हे भारावले. त्यांची बसस्थानकापासून घोड्यावरून मिरणूक काढण्यात आली ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार सन्मान सोहळा घेण्यात आला या सोहळ्याला दोंडाईचाचे प्राचार्य डी.एन.जाधव, हस्ती स्कूलचे चेअरमन कैलास जैन, मालपूरचे सरपंच मच्छिंद्र पारधी, कैलास माळी, हेमराज नाना पाटील, श्रावण अहिरे, बापू महाराज उपस्थित होते. यशस्वीतेसाठी योगेश्वर माळी,सचिन सोनवणे,इम्रान मण्यार,विलास इंडवे,ज्ञानेश्वर माळी,रोहित भामरे,विलास माळी, अविनाश ठाकूर, आदींनी परिश्रम घेतले.