लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात धुळे जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेवून दुपारी दोन वाजेपर्यंत गॅरेज सुरु ठेवण्याची परवानगी दिल्याने कारागिरांचा रोजगार पुन्हा सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे़ वाहने दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सुटला आहे़कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे गेले दोन महिने सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते़ स्थानिक जिल्हा प्रशासनाचा देखील संपूर्ण लॉकडाउनचा आदेश जारी होता़ वाहतूकही बंद आणि वाहने दुरुस्तीचे कामे देखील बंद करण्यात आली होती़ परंतु जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी अवजड वाहनांना वाहतुक करण्याची परवानगी शासनाने दिली होती़ दरम्यान, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात प्रशासनाने काही उद्योग, व्यवसायांना मुभा देण्याचे आदेश शासनाने दिले होते़ त्यानुसार प्रशासनाने शहरातील गॅरेज दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती़
कारागिरांचा रोजगार पुन्हा सुरु झाल्याने मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:56 IST