शिरपूर फॉर्मसीचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:09+5:302021-09-10T04:43:09+5:30

द्वितीय वर्ष डी. फार्मसीत हर्षा एकनाथ खैरनार व प्रगती अशोक कोळी यांनी प्रत्येकी ९४.८० टक्के मिळवित प्रथम क्रमांक पटकावला. ...

Result of Shirpur Pharmacy is 100% | शिरपूर फॉर्मसीचा निकाल १०० टक्के

शिरपूर फॉर्मसीचा निकाल १०० टक्के

द्वितीय वर्ष डी. फार्मसीत हर्षा एकनाथ खैरनार व प्रगती अशोक कोळी यांनी प्रत्येकी ९४.८० टक्के मिळवित प्रथम क्रमांक पटकावला. कृष्णा विशाल महाजन (९४.४० टक्के) द्वितीय, नंदिनी हुकूमचंद चौधरी (९३.९० टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रथम वर्ष डी. फार्मसीमध्ये श्रद्धा गोकूळ पाटील (९४ टक्के) प्रथम, द्वितीय नाजुका रमेश चौधरी (९२.७३ टक्के) द्वितीय तर, श्रुतिका नीना बोरसे (८९.०९ टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक चिंतनभाई पटेल, आरसीपी आईईआरचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा, आरसीपी आईओपीचे प्राचार्य डॉ. नितीन हासवाणी यांनी कौतुक केले. प्रा. अश्विन तोरणे, प्रा. संगीता बडगुजर, प्रा. गोविंदा भंडारी, प्रा. सुघोष उपासनी, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. पूजा मुंदडा, प्रा. युवराज पावरा, प्रा. घनश्याम गिरनार, प्रा. दीक्षिता पाटील, प्रा. धनराज महाजन, दिनेश चौधरी, दीपक जाधव, सुजित राजपूत, अशोक पावरा, अक्षय पावरा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Result of Shirpur Pharmacy is 100%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.