तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी ईश्वरचिठ्ठीने निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:13+5:302021-01-19T04:37:13+5:30
त्यात सोनशेलू प्रभाग क्रमांक एकमध्ये कमलबाई नानाभाऊ गिरासे व म्हसदे रत्ना मनोहर यांना प्रत्येकी १६४ माते पडली त्यात ५ ...

तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी ईश्वरचिठ्ठीने निकाल
त्यात सोनशेलू प्रभाग क्रमांक एकमध्ये कमलबाई नानाभाऊ गिरासे व म्हसदे रत्ना मनोहर यांना प्रत्येकी १६४ माते पडली त्यात ५ वर्षांची लहान मुलगी सायली सुधीर शिंपी या मुलीने ईश्वरचिठ्ठी काढली. त्यात रत्ना म्हसदे विजयी झाल्या. त्याचप्रमाणे, सुराय येथील चव्हाण न्हानजी ओंकार व ठाकरे भीमसिंग आंबरसिंग यांना प्रत्येकी २५८ मते पडली. त्यात ईश्वरचिठ्ठीतून न्हानजी चव्हाण विजयी झाले, तर नवे कोळदे येथील गिरासे पूनम प्रवीण व रामराजे प्रमिला राजेंद्र यां दोघांना ८७ मते समसमान पडल्याने यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून सायली शिंपी हिने काढली. त्यात पूनम गिरासे या विजयी झाल्या. यावेळी निवडणूक निरीक्षक जळगावचे उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार सुनील सैदाने हे उपस्थित होते.