बोराडी फार्मसीचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:57+5:302021-06-05T04:25:57+5:30
किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ॲाफ फार्मास्युटिकल एज्युकेशन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या प्रथम ...

बोराडी फार्मसीचा निकाल १०० टक्के
किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ॲाफ फार्मास्युटिकल एज्युकेशन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या प्रथम वर्ष २०२१ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. फॉर्मसीचा प्रथम वर्षाचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम माधुरी भरत पाटील ९६.७४ टक्के, द्वितीय गुंजन सुनील मराठे ९६.४४, तृतीय वैभव बाळासाहेब साळुंखे ९४.२२, चतुर्थ रौनक मनोज पवार ९४.६७, तर मेघराज कैलास पाटील ९४.३७ टक्के याने पाचवा क्रमांक मिळवला.
द्वितीय वर्षाचा निकालही १०० टक्के लागला. त्यात प्रथम क्रमांकाने अश्विनी विजय सोनवणे ८५.७१, अतुल भगवान ढोले ८६.०८, शारदा सुभाष बडगुजर ९५.२६, दिव्या दर्यावसिंग राजपूत ८४.२१, अस्मिता दिलीप वसईकर ८१़.११ टक्के मिळविले
किसान प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, उपसरपंच राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, शशांक रंधे, प्राचार्य डॉ. प्रकाश एच. पाटील, प्राचार्य महेश पी. पवार व प्राध्यापक कल्पेश एस. वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.